Monday, July 6, 2015

वैद्यक-गणहो यारे यारे

वैद्यक-गणहो यारे यारे,
एक-एक धागा विणूया सारे !
ध्वज आयुर्वेदचा फडकवूया रे !
वाहती पहा आरोग्याचे वारे !
आयुर्वेदामृत जनी पसरवूया रे !!

असता समूह वैद्यांचा,
तरी रे.. भरतभूवरी आरोग्य साशंक का रे ?
करा निःसंशय आधी सर्व जना रे..
निरोगी बलवान करा भारता रे !!

होता प्रज्ञापराध, मग जन सारे भोगे...
करुनही यत्न बहु, रोग लागती मागे...
टाळावया जनपद विध्वंसाचे धोके..
चला वेळीच घाला सदवृत्ताचे टाके !!

रोग नाही , अपथ्या-वाचून...
सावरावे जनास.... प्रज्ञापराधा पासून !
पथ्य पाळीता, सारे सोपे !
आपल्या हाती आयुष्याची मापे !!

दिनचर्येचे महत्व आगळे...
पालन करिता सहज ते कळे !
सांगून लोका सुज्ञ करा रे...
आधी स्वतः अवलंबून दावा रे !!

अहो, सहा ऋतुंचे... सहा सोहळे...
परी, "आहार-विहार" कोणा न कळे !
ऋतुसंधीत शोधनाने नांगरुया मळे...
ऋतुचर्या पाळता, चोखा आरोग्याची फळे !!

धन्वंतरी... एकची रोगहर्ता...
कृपेसाठी व्हावे आपणची कर्ता !
तन-मनाचे आपणच भर्ता !
इंद्रियसंयमी न येई रोगवार्ता !!

व्हावा आयुर्वेदाचा अखण्ड जागर...
अन् आरोग्याची भरु द्या घागर !!
कधी न पडावा आयुर्वेदाचा विसर..
सर्वत्र फुटावे आयुर्वेदामृताचे पाझर !!

वैद्यक-गणहो यारे यारे,
एक-एक धागा विणूया सारे !
ध्वज आयुर्वेदचा फडकवूया रे !
वाहती पहा आरोग्याचे वारे !
आयुर्वेदामृत जनी पसरवूया रे !!

- प्र* 12:49 PM 6/26/2015 ‪
#आयुर्वेदामृत‬
© वैद्य प्र. प्र. व्याघ्रसूदन
संपादक व लेखक : आयुर्वेदामृत,
पुनर्वसु आयुर्वेदीक चिकित्सालय, न.मुं-७०५.
संपर्क : ९८६७ ८८८ २६५

No comments:

Post a Comment